आधार दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:28+5:302021-02-05T09:22:28+5:30
------ कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन इंझोरी : कांदा पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर कृषी विभाग भर देत आहे. यासाठी कांदा चाळ ...

आधार दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांची धडपड
------
कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
इंझोरी : कांदा पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर कृषी विभाग भर देत आहे. यासाठी कांदा चाळ योजना राबविली जात असून, शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यात इंझोरी येथे शुक्रवारी या पिकाच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी विनोद घोडेकर यांच्या निर्देशानुसार कृषी सहाय्यक जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले.
---------------
पालकांचे संमतीपत्र मिळेना
इंझोरी : शासनाच्या निर्देशानुसार पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या. यासाठी इंझोरी परिसरातील शाळांची साफसफाईसुद्धा करण्यात आली; परंतु आता तीन दिवस उलटले तरी पालकांचे संमतीपत्र मिळत नसल्याने इंझोरी येथील शाळेत ३० टक्केही विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेला होत नसल्याचे शनिवारी दिसून आले.
पाण्याअभावी सुकले हरभरा, गहू पीक
इंझोरी : येथून जवळच असलेल्या जामदरा येथील सिंचन तलाव लिकेजमुळे आटल्याने २० शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा पीक पाण्याअभावी सुकून गेले आहे. कृषी व महसूल विभागाने या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राजेंद्र धुरट आणि राजेंद्र मस्के यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली.