विद्यार्थ्यांंनी साकारला गांडूळ खत, जलपुनर्भरण प्रकल्प!
By Admin | Updated: May 7, 2017 02:01 IST2017-05-07T02:01:36+5:302017-05-07T02:01:36+5:30
शिक्षकांचे प्रोत्साहन; राष्ट्रीय हरितसेनेचा पुढाकार.

विद्यार्थ्यांंनी साकारला गांडूळ खत, जलपुनर्भरण प्रकल्प!
वाशिम : पाणीसमस्येवर मात करणे तसेच दज्रेदार पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी निश्चित उपाय ठरणार्या "रेन वॉटर हार्वेस्टिंग" व गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांंंनी केली असून, अशाप्रकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणारी ही जिल्हय़ातील एकमेव शाळा ठरली आहे.
दिवसेंदिवस घटत चाललेल्या पर्जन्यमानामुळे जलपुनर्भरण काळाची गरज ठरली असून, दज्रेदार शेतमालाच्या उत्पादनासाठी गांडूळ खताचे महत्त्व आणि त्याची अत्यावश्यक गरज पाहता एस.एम.सी. इंग्लिश स्कूलमधील राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांंंनी हे दोन्ही प्रकल्प साकारण्याचा उपक्रम हाती घेतला. संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मीना उबगडे यांच्या नेतृत्वात तसेच हरितसेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांंंनी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि गांडूळखत या दोन्ही प्रकल्पांची निर्मिती केली.
मागील काही वर्षांंंपासून सातत्याने पर्यावरणाचा र्हास होत असून, यामुळे पावसाचे प्रमाण घटत असून, भूजल पातळीसुद्धा कमालीची खाली जात असून, यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरत आहे. दुसरीकडे शेतजमिनीचा कस देखील खालावत असून, पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम जाणवत आहे.
याशिवाय हाती पडणारे उत्पादन निकृष्ट दर्जाचे होत असल्याने यामुळे शेतकर्याना आद्गथक फटका सोसावा लागत आहे. एस.एम.सी.स्कूलमधील हरितसेनेच्या विद्यार्थ्यांंंनी ही बाब हेरुन शाळेच्या परिसरातील वाहून जाणारे पावसाचे पाणी पाइपलाइनद्वारे शोषखड्डा तयार करुन, त्यात तसेच विंधन विहिरीत सोडले आहे. परिसरातील पालापाचोळा, काडीकचरा गोळा करून गांडूळखत निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नामुळे शहरातील लाखाळा परिसरातील पाण्याच्या पातळीमध्ये हमखास वाढ होऊन संभाव्य पाणीटंचाईवरही मात करता येणार आहे. एस.एम.सी. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उभारलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग व गांडूळ खत या दोन्ही प्रकल्पास शासकीय तंत्र विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली.