शाळेत फुलविलेल्या भाजीपाल्याच्या मळयाची विद्यार्थ्यांनी केली देखरेख!

By Admin | Updated: February 8, 2017 15:54 IST2017-02-08T15:54:58+5:302017-02-08T15:54:58+5:30

वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गव्हा येथे शिक्षकांनी फुलविलेल्या भाजीपाल्याच्या मळयाचे संगोपन व देखरेख करण्यास सांगून विद्यार्थ्यांना शेतीचेही ज्ञान देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

The students of the school's sour cream are being monitored! | शाळेत फुलविलेल्या भाजीपाल्याच्या मळयाची विद्यार्थ्यांनी केली देखरेख!

शाळेत फुलविलेल्या भाजीपाल्याच्या मळयाची विद्यार्थ्यांनी केली देखरेख!

ज्ञानदानासोबतच कृषीचेही ज्ञान : जिल्हा परिषद शाळा गव्हा
 
बबन देशमुख, ऑनलाइन लोकमत
मानोरा (वाशिम), दि. ८ -  तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गव्हा येथे शिक्षकांनी फुलविलेल्या भाजीपाल्याच्या मळयाचे संगोपन व देखरेख करण्यास सांगून ज्ञानदानासोबतचं कृषीचेही ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम शाळेने सुरु केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
तालुक्यातील गव्हा शाळेत जवळपास विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे व मिळणारा पोषण आहारही याच मळयातील भाजीपाल्यातून मिळावा यासाठी शिक्षकांनी हा प्रयोग केला आहे. यासह विविध प्रयोगामुळे जिल्हयातील ही पहिली आयएसओ नामांकीत शाळा आहे. २०१६ या वर्षापासून शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील परसबागेत पालेभाजांचा मळा फुलविला आहे. वाफे तयार करुन पालक, मेथी, कोथींबीर, मुळा, शेपु  इत्यादी भाजा लावल्या आहेत.  भाज्यांवर झालेली कीड, पाणी देणे, भाजी काढणे व यासह इतर बाबीचे धडे विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत.

Web Title: The students of the school's sour cream are being monitored!