शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By Admin | Updated: July 30, 2014 00:37 IST2014-07-30T00:37:42+5:302014-07-30T00:37:42+5:30
शिक्षकांची तीन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
पिंपळगाव : येथील जि.प. शाळेत शिक्षकांची तीन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकवर्ग चिंतेत असून अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या टि.सी. काढण्याचा सपाटा लावल्याने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांंची पटसंख्या घटत आहे.
वेळोवेळी संबंधित बाब केंद्रप्रमुख व संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देउनही शाळेला कायमस्वरुपी शिक्षक मिळत नसल्याने नागरिकांनी २८ रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. मात्र तात्काळ केंद्रप्रमुख एस. देवळे यांनी शाळेला भेट देउन दोन ते तीन दिवसात पर्यायी शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्याने सदर ताला ठोको आंदोलन स्थगित करण्यात आले होते. पिंपळगाव येथील जि.प. शाळेत शिक्षकांची आठ पदे मंजूर असून सद्यस्थितीत पाच शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापक व दोन पदविधर शिक्षकांची पदे रिक्त असून जि.प. शाळेतील शिक्षक संजय कापसे हे कित्येक दिवसापासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहे. मुख्याध्यापकाला कार्यालयीन कामे बरीच करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांंच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांनी २३.७.२0१४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देउन त्वरित शिक्षकांची नेमणूक करण्याची विनंती केली होती. तसेच शाळेला शिक्षक न दिल्यास ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.