देवीचा दरबार भरवून फसवणुक करणा-या दाम्पत्यास अटक
By Admin | Updated: March 4, 2015 02:33 IST2015-03-04T01:59:38+5:302015-03-04T02:33:31+5:30
अनसिंग येथील घटना.

देवीचा दरबार भरवून फसवणुक करणा-या दाम्पत्यास अटक
अनसिंग (जि. वाशिम) : येथून जवळच असलेल्या उमरा शम येथे धार्मिक कार्यक्रमाच्या पडद्याआड देवीचा दरबार भरवून लोकांची आर्थिक फसवणुक करणार्या दांपत्यास अनसिंग पोलिसांनी मंगळवारी सकाळी १0 वाजता त्याच्या घरी धाड टाकून अटक केली. अनसिंग पोलिस स्टेशान अंतर्गत येणार्या उमरा शम येथे धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली जादुटोणाच्या गंभीर प्रकार सुरू असल्याबाबत येथील महाराष्ट्र अंधङ्म्रध्दा निमूर्लनचे कार्याध्यक्ष पुंजाजी सदाशिव खंदारे यांनी अनसिंग पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिली होती. या अगोदर दोन वेळा अंधङ्म्रध्दा निर्मूलन समितीकडून या देवीच्या दरबाराचे स्टिंग ऑपरेशन सुद्धा करण्यात आले होते. या गंभीरप्रकाराची दखल घेत अनसिंग पोलिसांनी मीरा दीपक सावळे (४७) व तिचा पती दीपक सखाराम सावळे या दोघांना मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कलम ३ (२) महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादुटोना अधिनियम नुसार गुन्हा नोंदवून या दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोकांची आर्थिक लुबाडणुक करुन फसवणार्या या दाम्पत्याचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास अनसिंग ठाणेदार आर.आर.कदम करीत आहेत. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी घटनास्थळाला भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय वाळके यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपसा ठाणेदार आर.आर.कदम, एम.एम.पठाण, बिट जमादार घुगे, ङ्म्रृंगारे करत आहे.