समृद्धीच्या कामासाठी भरपावसाळ्यात धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:26+5:302021-07-31T04:41:26+5:30
वाशिम : समृद्धी महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ५२ गावांतून जाणाऱ्या या मार्गाचे बरेच ...

समृद्धीच्या कामासाठी भरपावसाळ्यात धडपड
वाशिम : समृद्धी महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ५२ गावांतून जाणाऱ्या या मार्गाचे बरेच काम अद्याप शिल्लक असल्याने भरपावसाळ्यात या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची कसरत कंत्राटदार आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जात आहे.
^^^
मालेगाव पशुसंवर्धनची सहा पदे रिक्त
वाशिम : मालेगाव तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त आहेत. मालेगाव तालुक्यातील मालेगाव, शिरपूर, मेडशी, राजाकिन्ही या चारही ठिकाणची पशुवैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय केंद्रांचा कारभार प्रभारीचा खांद्यावर आहे.
-------
शेतकऱ्यांना जाणवतोय मजुरांचा तुटवडा
वाशिम : जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्यानंतर पिकांना संजीवनी मिळाली आहे. गत तीन दिवस आलेल्या पावसाने पिकांत तणही वाढत आहे. हे तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना महिला मजूर मिळेनासे झाले आहेत.
---------------
सापांपासून सावध राहण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीनसह खरीप पिकांची जोमदार वाढ झाली आहे. या पिकांत नाग, घोणस, मण्यार या विषारी सापांचा खाद्यासाठी संचार वाढला आहे. त्यामुळे सापांपासून सावध राहण्याचा इशारा सर्पमित्र तथा मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी दिला आहे.