रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तलाठय़ास मारहाण

By Admin | Updated: March 9, 2015 02:19 IST2015-03-09T02:19:22+5:302015-03-09T02:19:22+5:30

अनसिंग येथील पैनगंगा पात्राजवळील घटना; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Struggling to catch a sand tractor | रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तलाठय़ास मारहाण

रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तलाठय़ास मारहाण

अनसिंग (जि. वाशिम) : येथून जवळच असलेल्या तरोटी गावानजीक असलेल्या पैनगंगा पात्रात रेतीचे अवैध उत्खनन करणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तलाठय़ाला मारहाण करून जखमी केल्याची घटना ८ मार्चला सकाळी ९ वाजतादरम्यान घडली. अनसिंग पोलीस स्टेशनला वारला येथील तलाठी कैलास विठ्ठल रोही यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तरोडी गावानजीक रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त करीत असताना तू आमचे ट्रॅक्टर जप्त का करतोस, या कारणावरून आरोपी गिरजाराव मस्के, गजानन मस्के, दिनकर मस्के, पांडू जाधव, रा. जयपूर व राजू मुसळे रा. घोटा व इतर तीन ते चार जणांनी संघटित होऊन मारहाण करून जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कागदपत्रे फाडून टाकले. तसेच फिर्यादीच्या साथीदारांनासुद्धा मारहाण करून जखमी केले. या फिर्यादीवरून अनसिंग ठाणेदार चंद्रशेखर कदम यांनी आरोपीवर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३२३, ३२४, ५0६, १८९ भादंवि व ८(१) ब क्रिमिनल अमडमेंट लॉ यावरून गुन्हा दा खल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास ठाणेदार चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक आशीष बेतल हे करीत आहेत. रोही यांना मार लागल्याने त्यांच्यावर अनसिंग ग्रामीण रुग्णालयात उपचार केले.

Web Title: Struggling to catch a sand tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.