जिल्हाध्यक्षाची सूत्रे हाती घेताच संघटनेसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:07+5:302021-09-14T04:48:07+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : जिल्ह्यात एकीकडे काही लाेकप्रतिनिधींमध्ये घाेटाळ्याचे आराेप हाेत असतानाच दुसरीकडे नव्यानेच नियुक्त झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ...

जिल्हाध्यक्षाची सूत्रे हाती घेताच संघटनेसाठी धडपड
नंदकिशोर नारे
वाशिम : जिल्ह्यात एकीकडे काही लाेकप्रतिनिधींमध्ये घाेटाळ्याचे आराेप हाेत असतानाच दुसरीकडे नव्यानेच नियुक्त झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अमित झनक पक्षसंघटनेसाठी जाेमाने कार्य करताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याबराेबर पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व लहानातल्या लहान कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे दिसून येत आहे.
अतिशय संयमी, मनमिळावू व कार्यतत्पर असे व्यक्तिमत्त्व म्हणून अमित झनक यांची ओळख आहे. त्यामुळे भाजपच्या लाटेतही त्यांनी आपला गड (मतदारसंघ) कायम ठेवल्याचे आजही नागरिक बाेलताना दिसून येतात. काही महिन्यांआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी जिल्हा दाैरा केला असता, काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याचे संकेत दिले हाेते. त्यामुळे जिल्हाध्यक्ष काेण हाेणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागून हाेती. अनेकांची नावेही पुढे आलीत; परंतु जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षसंघटन मजबूत काेण करू शकते, याचा अभ्यास करण्यात आला व याेग्य निर्णय घेण्यात आला. अमित झनक यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्याबराेबर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. शहरासह जिल्ह्यातील कानाकाेपऱ्यातील कार्यकर्ते त्यांना भेटत असून ते सुद्धा स्वत: भेट घेत आहेत. छाेट्यात छाेट्या कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पक्षाने आपल्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी साेपविली आहे. पक्षवाढीसाठी, संघटन मजबूत करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलाे आहे. आता पक्षाने जबाबदारी टाकल्यानंतर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
- आ. अमित झनक,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस वाशिम