‘बर्ड फ्लू’विषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:16+5:302021-01-13T05:45:16+5:30

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पशुसंवर्धन ...

Strictly follow the bird flu guidelines! | ‘बर्ड फ्लू’विषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा!

‘बर्ड फ्लू’विषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा!

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, राज्यात ‘बर्ड फ्लू’ झालेले पक्षी आढळले असले तरी अद्याप जिल्ह्यात अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही. भविष्यातही हा आजार जिल्ह्यात पसरू नये, यासाठी पशुसंवर्धन, आरोग्य, वन आणि लघुपाटबंधारे विभागाने विशेष खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीफार्म चालक, पक्षीपालन करणाऱ्या सर्वांना काय करावे, काय करू नये, याविषयी माहिती द्यावी. जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने स्थानिक प्रशासनाला किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. ‘बर्ड फ्लू’चा प्रसार जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच या संदर्भात कोणत्याही अफवा पसरवू नये अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी केले.

===Photopath===

120121\12wsm_2_12012021_35.jpg

===Caption===

‘बर्ड फ्ल्यू’विषयक मार्गदर्शक सूचना

Web Title: Strictly follow the bird flu guidelines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.