रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांसह चिमुकल्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:33+5:302021-02-05T09:23:33+5:30

यावेळी पोलिसांनी आंदाेलनकर्ते यांना ताब्यात घेऊन कामरगाव पोलीस चैाकीत आणून त्यांना समज दिली. आंदोलनादरम्यान चिमुकल्यांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत ...

Stop Chimukalya's road with citizens for road repairs | रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांसह चिमुकल्यांचा रास्ता रोको

रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांसह चिमुकल्यांचा रास्ता रोको

यावेळी पोलिसांनी आंदाेलनकर्ते यांना ताब्यात घेऊन कामरगाव पोलीस चैाकीत आणून त्यांना समज दिली. आंदोलनादरम्यान चिमुकल्यांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. बारब्राम्हणवाडा कामरगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता औरंगापूर व ब्राम्हणवाडा येथील नागरिकांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिलीत; परंतु त्याचा काहीही फायदा न झाल्याने अखेर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. या रस्त्याची गेल्या दहा वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नसून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ब्राम्हणवाडा येथील गरोदर महिला छाया म्हस्के यांना दवाखान्यात घेऊन जात असताना पोटातील अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला., ब्राम्हणवाडा संग्राम सोनबावने या तरुणाला या रस्त्यावरील अपघातामुळे आपला पाय तोडावा लागल्याने कायमचे अपंगत्व आले, तसेच औरंगपूर येथील रमेश भगत यांचासुद्धा अपघातामुळे पाय मोडला, तर ब्राम्हणवाडा येथील अजित गोंडाणे यांचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने संपूर्ण जबडा निकामी झाला. अशा अनेक घटना या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडल्या. त्यामुळे औरंगपूर व ब्राम्हणवाडा या दोन्ही गावातील नागरिक वैतागुण गेल्याने अखेर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.

Web Title: Stop Chimukalya's road with citizens for road repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.