संजय राठाेड राजीनाम्याप्रकरणी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:31 IST2021-02-19T04:31:26+5:302021-02-19T04:31:26+5:30

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील स्थापन केलेल्या सजय राठोड मित्रमंडळ या संघटनेचे सदस्य आहोत. वाशिम ...

Statement on Sanjay Rathore's resignation | संजय राठाेड राजीनाम्याप्रकरणी निवेदन

संजय राठाेड राजीनाम्याप्रकरणी निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील स्थापन केलेल्या सजय राठोड मित्रमंडळ या संघटनेचे सदस्य आहोत. वाशिम जिल्ह्यात संजय राठोड पालकमंत्री असताना अनेक लोकांची त्यांनी निस्वार्थीपणे कामे केलेली असल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप आहे. अलीकडेच एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याबद्दल बदनामीकारक वृत्तामुळे राठोड यांचा चाहता वर्ग दु:खी झालेला आहे. संजय राठोड यांनी आम्हाला संयम ठेवायला सांगितल्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ कोणत्याही प्रकारचे आंदोलन सुरू केलेले नाही. संजय राठोड यांच्यासारख्या चारित्र्यवान नेत्याबद्दल अशा प्रकारचे निराधार आरोप करणे त्यांच्या अनुयायांना अजिबात आवडले नाही. त्यांचे चरित्र चांगले असल्यामुळे संजय राठोड हे दिग्रस दारव्हा विधानसभा मतदार संघातून नेहमी प्रचंड बहुमतांनी निवडून येतात. पुढील विधानसभा निवडणुकीतही प्रचंड बहुमताची आघाडी घेऊन राठोड हे निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यांच्या परिश्रमामुळे विदर्भ व मराठवाड्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राठोड हे शिवसेनेचे शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी दिलेल्या मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली असून, निवेदनावर संजय राठोड मित्रमंडळाचे शंकर ठाकूर, संतोष राठोड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Statement on Sanjay Rathore's resignation