आरक्षणाबाबत पटाेले यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST2021-06-11T04:27:46+5:302021-06-11T04:27:46+5:30

कारंजा येथे हाजी युसुफ पुंजानी यांच्या निवासस्थानी बिरसा क्रांती दल व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद वाशिम यांच्या संयुक्त ...

Statement to Patel regarding reservation | आरक्षणाबाबत पटाेले यांना निवेदन

आरक्षणाबाबत पटाेले यांना निवेदन

कारंजा येथे हाजी युसुफ पुंजानी यांच्या निवासस्थानी बिरसा क्रांती दल व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात आले.

आरक्षणातील मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती पूर्वीप्रमाणे तत्काळ लागू करावी. सर्वोच्च न्यायालयाने बोगस आदिवासी अधिकारी, कर्मचारी यांच्या रद्द केलेल्या १२,५०० जागांवर खऱ्या आदिवासींची नियुक्ती करावी, या मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राजेश मस्के, उपाध्यक्ष व्ही.टी. शिकारे, कारंजा तालुकाध्यक्ष चिंतामण कळंबे, शालीकराम मरस्कोले, गजानन गिरे, गोविंद भोंडणे उपस्थित होते. निवेदनावर अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार महिला जिल्हाध्यक्ष मालती राजेश मस्के, किसन करवते, विजय भुरकाडे, विष्णू जामकर, ताराचंद वाघमारे, ढलेश्वर पारधी, शंकर भड, प्रकाश लोखंडे, उमेश सिरसाट यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.

Web Title: Statement to Patel regarding reservation