संजय राठोड यांचा राजीनामा न स्वीकारण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST2021-02-17T04:48:52+5:302021-02-17T04:48:52+5:30

तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूजा चव्हाण यांचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणी ...

Statement to the Chief Minister regarding non-acceptance of Sanjay Rathore's resignation | संजय राठोड यांचा राजीनामा न स्वीकारण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

संजय राठोड यांचा राजीनामा न स्वीकारण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूजा चव्हाण यांचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणी आपले मत नोंदविले आहे, पूजा ही कर्जबाजारी होती, त्यामुळे तिची मन:स्थिती चांगली नव्हती, तिला चक्कर आल्याने ती खाली पडली, त्याचा संजय राठोड यांच्याशी संबंध नाही. तरीही विरोधी पक्षाचे लोक नाहक संजय राठोड यांची नाहक बदनामी करीत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, असे म्हटले आहे. पोहरादेवी येथील बंजारा महंत, महाराज व जनता राठोड यांच्या पाठीशी आहे. जर राजकीय दबावापोटी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला तर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे. या वेळी महंत संजय महाराज, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भोला राठोड, मोंटी राठोड, कबीरदास राठोड, पं. स. सदस्य अभिषेक चव्हाण, मनोहर राठोड, अर्जुन जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Statement to the Chief Minister regarding non-acceptance of Sanjay Rathore's resignation