वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय मोडिलिपी प्रशिक्षण शिबिराचा समारोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:02 PM2017-12-03T22:02:29+5:302017-12-03T22:03:52+5:30

State-level Modalipi training camp held at Washim concluded! | वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय मोडिलिपी प्रशिक्षण शिबिराचा समारोप!

वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय मोडिलिपी प्रशिक्षण शिबिराचा समारोप!

Next
ठळक मुद्देपुणे व कोल्हापूर विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनडॉक्टर, प्राध्यापक, वकील व विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सन १९५० पर्यंत प्रमुख लेखन पद्धती असलेल्या मोडी लिपीविषयी सर्वसामान्यांना माहिती मिळावी, या लिपीतील साहित्य सर्वांना अवगत व्हावे, या हेतूने पुरालेखागार विभाग, पुणे यांच्या वतीने स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात आयोजित १० दिवसीय राज्यस्तरीय मोडिलिपी प्रशिक्षण शिबिराचा समारोप शनिवारी झाला. जिल्ह्यातील डॉक्टर मंडळी, वकील, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होत प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षक तथा मार्गदर्शक सर्जेराव वाडकर (संकलक पुणे पुरालेखागार विभाग), विनायक पाटील (मोडी लिपी सहाय्यक, कोल्हापूर पुरालेख विभाग) यांनी शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मोडी लिपीविषयी इत्यंभूत प्रशिक्षण दिले. समारोपीय कार्यक्रमात बोलताना वाडकर यांनी सांगितले, की मोडी ही कुठलीही भाषा नसून लिपी आहे. त्यामुळे ती थोड्याफार सरावानंतरही लगेच शिकता येते. मोडी ही मराठीची १९५० पर्यंत प्रमुख लेखन पद्धती होती. आता ती प्रमुख नसली तरी जिवंत आहे आणि द्वितीय लेखन पद्धती म्हणून गणल्या जाते. मोडीमध्ये मराठी इतिहास दडलेला आहे. समाजाला मोडी जाणकारांची फार गरज आहे. कारण मराठीचे १९५० आधीचे जवळपास सर्वच कागदपत्रे मोडी लिपीमध्येच आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी मोडी लिपीमध्येच लिहिली आहे. त्यामुळे या लिपीविषयी सर्वांना माहिती मिळण्यासाठीच १० दिवस प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले, अशी माहिती वाडकर यांनी दिली. या कार्यक्रमास श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य यू. एस. जमधाडे, वाडकर, पाटील, सहायक प्रा.ए. टी. वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

Web Title: State-level Modalipi training camp held at Washim concluded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.