शाळा बंद असतानाच ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:41 IST2021-01-23T04:41:24+5:302021-01-23T04:41:24+5:30
२०२१-२२ या वर्षाकरिता राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्व पात्र शाळांची नोंदणी २१ ते ३० जानेवारी या कालावधीत करण्यात ...

शाळा बंद असतानाच ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
२०२१-२२ या वर्षाकरिता राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्व पात्र शाळांची नोंदणी २१ ते ३० जानेवारी या कालावधीत करण्यात यावी. त्याची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी. ज्या शाळा २५ टक्के प्रवेशासाठी पात्र आहेत; परंतु नोंदणी करत नाहीत किंवा एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करून देत नाहीत, अशा शाळांवर तत्काळ नियमानुसार कारवाई करण्याबाबत अथवा शाळेची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
.................
बॉक्स :
अर्ज करण्याची मुदत ९ ते २६ फेब्रुवारी
‘आरटीई’अंतर्गत २१ जानेवारी ते १५ मे २०२१ या कालावधीत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पालकांनी पाल्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ९ पासून २६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. ५ व ६ मार्च रोजी सोडत काढली जाणार आहे.