नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:03 IST2018-09-03T18:03:22+5:302018-09-03T18:03:26+5:30
प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी झाली असून, १ सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ झाला.

नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी झाली असून, १ सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ झाला. ३१ आॅक्टोबरपर्यंत असलेल्या या मोहिमेदरम्यान नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन वाशिमचे तहसिलदार बळवंत अरखराव यांनी सोमवारी केले.
१ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया व्यक्तींना या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार आहे. काही मतदारांच्या नाव, गाव व अन्य माहितीत चुका असल्याचे या चुकांची दुरूस्ती या मोहिमेदरम्यान केली जाणार आहे. कृष्णधवल छायाचित्र असणाºया मतदारांनी या मोहिमेदरम्यान रंगीत छायाचित्र आणून द्यावे, असे आवाहन तहसिलदार अरखराव यांनी केले. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी झाली असून, मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. त्याची यादीही पाहता येणार आहे. मतदारांची गैरसोय दूर करण्यासाठी आॅनलाईन मतदार नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन तहसिलदार बळवंत अरखराव, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक दंडे यांनी केले.