भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त राज्यासाठी ‘आप’च्या पाठीशी उभे रहावे - ब्रिगेडीअर सुधीर सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 14:01 IST2018-02-18T14:00:02+5:302018-02-18T14:01:56+5:30
मानोरा - महाराष्ट्रातील जनतेला भय, मुख व भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असल्यास जनतेने आपच्या पाठशी उभे रहावे, असे आवाहन ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पोहरादेवी येथे दर्शनाकरिता आले असता मंदिरात भाविकांना मार्गदर्शन करतांना केले.

भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त राज्यासाठी ‘आप’च्या पाठीशी उभे रहावे - ब्रिगेडीअर सुधीर सावंत
मानोरा - महाराष्ट्रातील जनतेला भय, मुख व भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असल्यास जनतेने आपच्या पाठशी उभे रहावे, असे आवाहन ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पोहरादेवी येथे दर्शनाकरिता आले असता मंदिरात भाविकांना मार्गदर्शन करताना केले.
जगतगुरु संत सेवालाल महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी, कबीरदास महाराज, सुभाष तंवर, अॅड.नरेश राठोड, मुरली चव्हाण, यवतमाळचे वसंत ढोके, नितीन चव्हाण, अनिल राठोड, विलास राठोड, प्रकाश राठोड, प्रा.जगदीश राठोड, आदिंची यावेळी उपस्थिती होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्यावतीने आपच्या मान्यवरांचे फेटा व शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना सावंत म्हणाले की, आघाडी व युती सरकारने सामान्य जनतेला थुलथापा देवुन शासनात आली, मात्र शेतकरी, मजुर, व्यापारी, शासनाच्या धोरणामुळे खुप मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. सामान्य जनतेकडे पर्याय नव्हता आता आपच्या माध्यमातुन पर्याय उपलब्ध असुन दिल्लीमधील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण,आरोग्य व शेतकºयाकरिता केलेली भरीव मदत सर्वांना माहित असल्यामुळे आता राज्यातील जनता आपकडे कौल वाढत आहे. यावेळी सुभाष तवर, मुरली चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन विलास राठोड यांनी केले. प्रास्ताविक अॅड.नरेश राठोड, आभार अनिल राठोड यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.