संपावर असतानाही आरोग्य सेविकेने केली महिलेची सुखरूप प्रसुती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:13 IST2018-04-18T15:13:39+5:302018-04-18T15:13:39+5:30

staff nurse help a woman to deliver a baby while on strike | संपावर असतानाही आरोग्य सेविकेने केली महिलेची सुखरूप प्रसुती!

संपावर असतानाही आरोग्य सेविकेने केली महिलेची सुखरूप प्रसुती!

ठळक मुद्दे कुंभी (ता.मंगरूळपीर) येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत सुजाता राठोड ह्या मुख्यालयीच वास्तव्याला आहेत. सपना रवि जाधव ही गर्भवती महिला आपल्या आई-वडिलांसमवेत वसंतवाडी येथून कुंभीच्या आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी हजर झाली. कामबंद आंदोलन पुकारलेले असतानाही आरोग्य सेविका सुजाता राठोड यांनी कुठलाच विचार न करता सपना जाधव यांची सुरक्षितरित्या प्रसुती करून माणुसकीचा प्रत्यय दिला.

 
वाशिम : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून संप पुकारत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुविधांचा पुरता फज्जा उडाला आहे. असे असले तरी यातीलच एका कनिष्ठ आरोग्य सेविकेने बुधवारी भल्या पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास एका महिलेची सुरक्षितरित्या प्रसुती करून माणुसकी आजही जीवंत असल्याचा प्रत्यय घडवून दिला. 
यासंदर्भात अधिक माहिती अशी, की कुंभी (ता.मंगरूळपीर) येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत सुजाता राठोड ह्या मुख्यालयीच वास्तव्याला आहेत. बुधवारच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास सपना रवि जाधव ही गर्भवती महिला आपल्या आई-वडिलांसमवेत वसंतवाडी येथून कुंभीच्या आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी हजर झाली. यावेळी तेथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्वे यांच्यासह इतर कुणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे अखेर संपात सहभागी असताना आणि कामबंद आंदोलन पुकारलेले असतानाही आरोग्य सेविका सुजाता राठोड यांनी कुठलाच विचार न करता सपना जाधव यांची सुरक्षितरित्या प्रसुती करून माणुसकीचा प्रत्यय दिला. त्यांच्या या पुढाकाराचे आणि प्रसंगावधान राखण्याच्या वृत्तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

Web Title: staff nurse help a woman to deliver a baby while on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.