एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:42 IST2020-12-05T17:40:22+5:302020-12-05T17:42:42+5:30
Akola Crime News रतन सिंह डाबेराव असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेउन आत्महत्या
अकोला - शहरातील एस टी महामंडळाच्या रिजनल वर्कशॉप येथे कार्यरत असलेल्या ४८ वर्षे वयाच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. रतन सिंह डाबेराव असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय समोर अजमेरा हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या क्वार्टरमध्ये रतन सिंह डाबेराव यांनी गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रतन सिंह डाबेराव हे एसटी महामंडळाच्या रिजनल वर्कशॉपमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.