मालेगावात श्री नवदुर्गा विसर्जन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 19:26 IST2017-10-01T19:26:23+5:302017-10-01T19:26:44+5:30
मालेगाव - मालेगाव शहारातील श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीस १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजतापासून सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत श्री नवदुर्गा विसर्जन होईल.

मालेगावात श्री नवदुर्गा विसर्जन !
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - मालेगाव शहारातील श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीस १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजतापासून सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत श्री नवदुर्गा विसर्जन होईल.
मालेगाव शहरात १६ सार्वजनिक नवदुर्गा मंडळाद्वारा श्री नवदुर्गा देवीची स्थापना २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील गावात ३१ सार्वजनिक नवदुर्गा मंडळाद्वारा नवदुर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती. १ ऑक्टोबर रोजी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून नवदुर्गा देवींच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. आदिशक्ती ,जगदंबेचा गर्जर करीत मूर्तीची मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. यावर्षी मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १0 गावात एक गाव एक सार्वजनिक नवदुर्गा मंडळ उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये, पांगराबंदी, डोंगरकीनही, उमरवाडी, मारसुल, सावळद, रेगाव, कोलदरा, खेर्डी बु., पांगरिकुटे, केळी या गावांचा समावेश होता.