१०० किलोमिटर ब्रेवेट सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 16:05 IST2019-07-16T16:05:03+5:302019-07-16T16:05:10+5:30
वाशिम : वाशिम सायकलस्वार व वाशिम रॉदीनर ग्रुपच्या वतीने १४ जुलै रोजी १०० किलोमिटर ब्रेवेट पॉप्युलर सायकल स्पर्धा पार पडली.

१०० किलोमिटर ब्रेवेट सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम सायकलस्वार व वाशिम रॉदीनर ग्रुपच्या वतीने १४ जुलै रोजी १०० किलोमिटर ब्रेवेट पॉप्युलर सायकल स्पर्धा पार पडली. त्यात २० सायकलस्वार युवकांनी भाग घेतला. विशेषत: परभणी जिल्ह्यातील येलदरी येथील दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले डॉ. प्रशांत मुंंढे यांनी या स्पर्धेत सहभागी होत अतुलनिय कामगिरी बजावली.
स्पर्धेस स्थानिक क्रीडा संकुल मैदानावरुन १४ जुलैला सकाळी सहा वाजता करण्यात आला. ७ तास ३० मिनीटे अशा निर्धारित वेळेत वाशिम, मालेगाव, केनवड, डोणगाव व परत वाशिम असे १०० किलोमिटरचे अंतर स्पर्धकांनी वेळेत पूर्ण केले. स्पर्धा समाप्तीनंतर सर्व स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले. या सायकल स्पर्धेत निलेश पाधेण, प्रशांत बक्षी, प्रमोद भालेराव, शहजादखान, चेतन शर्मा, रौनक तोष्णीवाल, दिपक मोरे, कोमल मोरे, शाम चव्हाण, दिव्यांग डॉ. प्रशांत मुंढे, रमाकांत जयस्वाल, महेंद्र मुंढे, मदन खंडेलवाल, डॉ. भरत सातपुते, शिवा साखरकर, रमेश घुगे, सुरेंद्र अहिर, प्रेम मेनकुदळे, चंद्रशेखर तडकसे या सायकलस्वारांनी सहभाग घेतला.
स्पर्धेेच्या यशस्वीतेसाठी वाशिम सायकलस्वार व रॉदीनर ग्रुपसह निरज चारोळे व दिलीप गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील १०० किलोमिटरची ब्रेवेट स्पर्धा १८ आॅगष्ट रोजी होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.