जलयुक्त शिवारच्या कामांना गती!
By Admin | Updated: April 11, 2017 20:03 IST2017-04-11T20:03:06+5:302017-04-11T20:03:06+5:30
वाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करावयाच्या कामांना गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी याकडे विशेष लक्ष पुरवत आहेत.

जलयुक्त शिवारच्या कामांना गती!
वाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करावयाच्या कामांना गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी याकडे विशेष लक्ष पुरवत आहेत.
जलयुक्त शिवारअंतर्गत करावयाच्या कामांकरिता यंदा शासनाकडून निधी मिळाला नसला तरी २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील ५५ कोटी ४७ लाख रुपयांच्या मंजूर निधीतून अखर्चित असलेला ७ कोटी १९ लाख रुपयांचा मोठा निधी शासनाकडून परत मिळाल्याने प्रलंबित तथा रखडलेली कामे प्रशासनाने पुन्हा एकवेळ हाती घेतली आहेत. त्यात विशेषत्वाने नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, सिमेंट नाला बांध, रिचार्ज ट्रेन्च, मातीनाला बांध, समतल सलग चर आदी कामे पूर्ण केली जात असल्याचे प्रशासनाने कळविले.