शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सोयाबीनचे दर साडे तीन हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:55 PM

वाशिम: सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात कमालीची तेजी आली असून, बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून या शेतमालास ३४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शुक्रवारच्या बाजारभावावरून स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात कमालीची तेजी आली असून, बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून या शेतमालास ३४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शुक्रवारच्या बाजारभावावरून स्पष्ट झाले आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा व्यापाºयांकडून अधिक दर मिळत असतानाही बाजारात या शेतमालाची आवक मात्र म्हणावी तेवढी वाढलेली आहे. वाशिम जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात २ लाख ८७ हजारांहून अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. मध्यंतरी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे या पिकाला फटका बसला तरी बहुतांश शेतकºयांना या पिकाचे चांगले उत्पन्नही झाले. या शेतमालाची काढणी पूर्ण झाल्यानंतर बाजारात खरेदीही सुरू झाली. हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच या शेतमालास चांगले दर मिळत होते. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू करणे खरेदीदार संस्थांना शक्य झाले नाही. त्यातच गेल्या आठवड्यापासून या शेतमालाच्या दरात कमालीची तेजी आली आहे. शासनाने सोयाबीनला यंदा ३३९९ रुपये हमीभाव घोषीत केले असताना व्यापाºयांकडून मात्र हमीभावापेक्षा अधिक दराने या शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत या शेतमालाचे दर ३५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यातच मंगरुळपीर बाजार समितीत या शेतामालाची व्यापाºयांकडून कमाल ३५१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली, तर वाशिम बाजार समितीत ३२५० ते ३४६०, कारंजा बाजार समितीत ३२५० ते ३४८५, रिसोड बाजार समितीत ३३९० ते ३४५०, मालेगाव बाजार समितीत ३३५० ते ३४५०आणि मानोरा बाजार समितीत ३२०० ते ३४७० रुपये दराने या शेतमालाची खरेदी झाली. अर्थात प्रत्येकच बाजार समितीत शेतकºयांना शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक दर व्यापाºयांकडून मिळत असल्याचे दिसत आहे. तथापि, या शेतमालाच्या दरात मोठी वाढ झाली असतानाही आवक मात्र फारशी वाढली नाही. शुक्रवारी कारंजा बाजार समितीत सर्वाधिक ७५०० क्विंटल, तर वाशिम बाजार समितीत २८७६, मंगरुळपीर बाजार समितीत २३०० आणि रिसोड बाजार समितीत २४८९ अशी साधारण आवक पाहायला मिळाली.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम