सोयाबीनच्या बाजारभावात १०० रुपयाने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:39 IST2018-12-03T16:38:51+5:302018-12-03T16:39:16+5:30
वाशिम : गत आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळालेली झळाळी ही अल्पकालीन ठरली असून, चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयाने घट आली आहे.

सोयाबीनच्या बाजारभावात १०० रुपयाने घट
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळालेली झळाळी ही अल्पकालीन ठरली असून, चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयाने घट आली आहे. सोमवार, ३ डिसेंबर रोजी बाजार समित्यांमध्ये ३१०० ते ३३०० रुपये प्रती क्विंटल असे दर होते.
यावर्षी शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खरिप हंगामात पावसात सातत्य नसल्याने सोयाबीन, उडीद व मूगाच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. सुरूवातीला सोयाबीनला २२०० ते २८०० रुपयांदरम्यान प्रती क्विंटल बाजारभाव मिळाले. दिवाळीनंतर बाजारभाव हळूहळू वाढ होत गेली. गत आठवड्यात तर ३४०० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला चांगलीच झळाळी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवार, ३ डिसेंबरला सोयाबीनच्या प्रती क्विंटल बाजारभावात १०० ते १५० रुपये घट आल्याचे दिसून आले. सोमवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला ३२०० ते ३३३५ रुपये असे प्रती क्विंटल दर होते. रिसोड बाजार समितीत ३१६० ते ३३२० रुपये असे दर होते. गत आठवड्यात वाशिम बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल ३२०० ते ३४३१ रुपयांदरम्यान बाजारभाव होते. प्रती क्विंटल १०० ते १५० रुपयाने बाजारभावात घसरण झाल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.