अतिपावसाने सोयाबीनचे नुकसान; शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:01 IST2018-07-28T12:59:00+5:302018-07-28T13:01:02+5:30
जोगलदरी: गत आठवड्यात झालेल्या अतिपावसामुळे परिसरात काही शेतकºयांच्या सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.

अतिपावसाने सोयाबीनचे नुकसान; शेतकरी संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगलदरी: गत आठवड्यात झालेल्या अतिपावसामुळे परिसरात काही शेतकºयांच्या सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अति पावसामुळे माती वाहून गेल्याने पिकाची मुळे उघडी पडली असून, आता पिक सुकत चालले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी परिसरात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जुन महिन्यात दमदार पावसामुळे हे पीक चांगलेच बहरले; परंतु जुलैच्या मध्यंतरानंतर पावसाची रिपरिप सुरु झाली सतत आठ ते दहा दिवस पावसाने ठाणच मांडले. त्यामुळे नाल्याच्या काठावर, खोलगट भागात असलेल्या शेतामधील माती वाहून गेली आणि पिकाची मुळे उघडी पडली. आता हे पीक पिवळे पडून सुकत आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. निवडक शेतकरी यावर पर्याय म्हणून नाल्यातील गाळ शेतजमिनीवर पसरवून पिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.