हरभरा बिजोत्पादनासाठी १३२२ हेक्टरवर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:08 IST2019-01-28T14:02:02+5:302019-01-28T14:08:46+5:30
वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १३२१.८० हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली आहे.

हरभरा बिजोत्पादनासाठी १३२२ हेक्टरवर पेरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १३२१.८० हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली आहे.
महाबीजच्या बिजात्पादन प्रकल्पांतर्गत शेतकरी मुग, उडिद, तूर, हरभरा आणि गहू या पिकाची पेरणी करतात. यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे आणि त्या खालोखाल हरभºयाची पेरणी केली जाते. यंदा जिल्ह्यात ३२७३ शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली होती. या शेतकºयांकडून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली, तर आता रब्बी हंगामात ६६१ शेतकºयांनी हरभरा बिजोत्पादनासाठी १३२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. महाबीजच्या प्रकल्पांतर्गत या शेतकºयांकडून उत्पादित झालेला हरभरा रितसर मोजून घेतला जाणार असून, शेतकºयांना बाजार समित्यांत ठरलेल्या मुदतीच्या काळातील सर्वोच्च दराची सरासरी काढून त्यात २५ टक्के रक्कम मिळवून मोबदला दिला जाणार आहे. दरम्यान, गतवर्षी अपुरा पाऊस आणि इतर अडचणींमुळे निर्धारित संख्येपेक्षा कमी शेतकºयांनी महाबीजसाठी हरभºयाचे उत्पादन घेतले होते; परंतु यंदा बाजारात असलेले चांगले दर आणि पोषक वातावरणामुळे बिजोत्पादन प्रकल्पात शेतकºयांनी हरभरा पेरणीस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यंदा हरभरा बियाण्यांचे अधिक उत्पादन होऊन शेतकºयांना पुढील हंगामासाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे.