वाशिम जिल्ह्यातील नऊ पाणी पुरवठा योजनांना मिळणार सौर ऊर्जा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 14:02 IST2017-12-03T14:01:45+5:302017-12-03T14:02:01+5:30
जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली.

वाशिम जिल्ह्यातील नऊ पाणी पुरवठा योजनांना मिळणार सौर ऊर्जा!
कारंजा लाड - जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली.
ग्रामीण भागात ग्राम पंचायतींकडे वीज देयकाची थकबाकी असल्यामुळे व वीजेच्या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर बसविण्यात याव्या अशी मागणी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी उर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांनी सौर उर्जा पंपाकरिता वाशिम जिल्हा परिषद तसेच भुजल सर्वेक्षण विभागामार्फत सदर योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश दिले असुन संबंधित ग्रामपंचायत मार्फत आलेला प्रस्ताव तातडीने पाठविण्यासाठी आदेशीत केले आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध केला असुन निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे काम तातडीने सुरू होणार आहे. उन्हाळ्यापुर्वी निवड झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याचे पाटणी यांनी सांगितले.
भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांचा समावेश सौर ऊर्जेवर करण्यासंदर्भात ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली होती. सौर ऊर्जा योजना मंजुर झाल्यास सलग १२ तास ग्रामीण भागात पाणी पुरवठा होणार आहे. अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असून येत्या पाच वर्षात १४ हजार ४०० मेगॉव्हॅट वीज निर्मितीसह ४० लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असल्याचे ऊर्जा व नवीकरणीय ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले असे पाटणी यांना प्रसिद्धी पत्रकात म्हटले. सौर ऊर्जच्या माध्यमातून वीज देयकामध्ये ५० टक्के बचत होत असल्यामुळे सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जेचा वापरासाठी शासनाने नवीन धोरण ठरविले आहे. शेतकºयांच्या शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे पीक वाचवू शकत नाहीत. या नैराश्यातून शेतकºयांच्या बहुतांश आत्महत्या झाल्या आहेत. अशा शेतकºयांच्या कुटुंबियांना अत्यंत अल्पदरात सौर कृषी पंप देण्यात यावा तसेच विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पाटणी यांनी ना.बावनकुळे यांचेकडे केली होती.