पार्डी टकमोर येथे माती परीक्षण, खरीपपूर्व शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST2021-03-19T04:40:51+5:302021-03-19T04:40:51+5:30
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तांत्रिक समन्वयक एस. के. देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्देश सांगून शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामाच्या दृष्टीने माती ...

पार्डी टकमोर येथे माती परीक्षण, खरीपपूर्व शेतकरी प्रशिक्षण
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तांत्रिक समन्वयक एस. के. देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्देश सांगून शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामाच्या दृष्टीने माती परीक्षण नवीन वाण बीज प्रक्रिया याबाबतचे तांत्रिक ज्ञान अवगत करून शेतीवरील होणारा खर्च कमी करावा असे आवाहन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक कृषी विद्या शाखेचे प्रमुख टी. एस. देशमुख यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने मातीचा नमुना घेण्याची पद्धत व त्यापासून होणारे फायदे याविषयी तांत्रिक विवेचन केले. जिल्ह्यातील सोयाबीन व तुरीचे क्षेत्र पाहता नवीन वाणाचा वापर प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या एमएयूएस १५८, जेएस ९३०५ तसेच तूर पिकाच्या सुधारित पीकेव्ही तारा, बीडीएन ७१६, बीएसएमआर ७३६, एकेटी ८८११, बीडीएन ७०८ आदी वाणांची माहिती दिली. तांत्रिक सत्राच्या शेवटी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील प्रयोगशील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन वसंतराव चौधरी तर आभार प्रदर्शन दिनेश चौधरी यांनी केले.