नाल्याची सफाई करून राबविला सामाजिक उपक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST2021-01-15T04:33:56+5:302021-01-15T04:33:56+5:30
रिसोड शहर हे पुरातन शहर म्हणून ओळखले जाते . गावाचे आराध्य दैवत म्हणून संत अमरदास बाबा आहेत. या ...

नाल्याची सफाई करून राबविला सामाजिक उपक्रम!
रिसोड शहर हे पुरातन शहर म्हणून ओळखले जाते . गावाचे आराध्य दैवत म्हणून संत अमरदास बाबा आहेत. या मंदिराजवळून एक नदी वाहते पूर्वी त्या पाण्याचा सदुपयोग व्हायचा परंतु कालांतराने या बाबीकडे दुर्लक्ष होऊन नदीचे रुपांतर नाल्यात होऊन येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले . या नाल्यामध्ये केर, कचरा टाकाऊ पदार्थ टाकून यांचे विद्रुपीकरण सुरू झाले परंतु कुणीही या गंभीर बाबीची दखल घेतली नाही. शहरातील हिंदवी परिवार नावाच्या ग्रुपच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी या नाल्याची साफसफाई करून सार्वजनिक उपक्रम राबविला. जवळपास अनेक टन कचरा काढून नाल्याला पूर्वरुप दिले. या कामी हिंदवी परिवाराचे सदस्य रिसोड न.प. चे मुख्याधिकारी गणेश पांडे, अरुण क्षीरसागर, अनिल वाघ, विकास इरतकर, संतोष गाभणे, किशोर शर्मा, राधेश्याम व्यवहारे, रवि अडाने, आनंद झडपे, राजेश सोनुने, मंगेश कांबळे, अरुण बगडीया, गजानन गरकळ, विद्यासागर खराटे, यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.