ग्रामीण भागात धुरमुक्त अभियानाला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST2021-05-16T04:40:05+5:302021-05-16T04:40:05+5:30
............. मेडशी परिसरात अवैध रेती वाहतुक वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून अवैधरित्या रेतीची वाहतुक होत असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात ...

ग्रामीण भागात धुरमुक्त अभियानाला खीळ
.............
मेडशी परिसरात अवैध रेती वाहतुक
वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून अवैधरित्या रेतीची वाहतुक होत असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी युवकांनी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
...........
जिल्हा हिवतापची इमारत जीर्ण
वाशिम : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधादेखिल मिळणे दुरापास्त झाले आहे. नवी इमारत मिळण्याची मागणी होत आहे.
.........
जऊळकात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायतीने लक्ष पुरवावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
........
किन्हीराजा येथे जनजागृती
वाशिम : किन्हीराजा (ता.मालेगाव) येथे सोमवारी ग्रामपंचायतीने कोरोनाविषयक जनजागृती केली. तोंडाला मास्क वापरण्यासह हात नियमित स्वच्छ ठेवा. लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्या, असे आवाहन यादरम्यान करण्यात आले.
............
दुचाकींवर तिबल सीट वाहतूक
वाशिम : वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही शहरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहनांवर तिबल सीट वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शहर वाहतूक विभागाने याप्रकरणी शुक्रवारी अनेकांवर कारवाई केली.
.........
लसीकरण करून घेण्याचे आवाहन
वाशिम : ग्रामीण भागात काहीठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक अद्यापही लसीकरणासाठी पुढे यायला टाळाटाळ करित आहेत. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याकरिता प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.
..............
जऊळका येथे पोलिसांकडून कारवाई
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथून मालेगावकडे येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारच्या सुमारास थांबून नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. संबंधितांकडून आर्थिक दंड वसूल करण्यात आला.
...............
उपाययोजनांची चोख अंमलबजावणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अंमलात आलेल्या विविध उपाययोजनांची शहरात चोख अंमलबजावणी केली जात आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागाने शनिवारी कारवाई केली.
..............
भाजीविक्रेत्यांना मिळाला दिलासा
वाशिम : प्रशासनाच्या निर्बंधामुळे गत सात दिवसांपासून वाशिम शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. १५ मे रोजी हे निर्बंध हटविल्याने विशेषत: भाजीविक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
................
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
वाशिम : आगामी खरीप हंगामासाठी शेती सज्ज ठेवण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. त्यानुषंगाने ट्रॅक्टरव्दारे मशागतीची कामे अंतीम टप्प्यात असून डिझेलचे दर वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दर कमी करण्याची मागणी होत आहे.
.............
गावठाण सर्वेक्षण कामास ‘ब्रेक’
वाशिम : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले; मात्र कोरोना संकटामुळे त्यास ‘ब्रेक’ लागला आहे.
............
दुकाने बंदमुळे लघुव्यवसाय ठप्प
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर दुकानांसह पादचारी मार्गावर बसून व्यवसाय करणाऱ्या लघूव्यावसायिकांची दुकानेही बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. यामुळे लघुव्यवसाय ठप्प असून अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.