रस्त्यांची कामे संथगतिने; धुळीने माखले वाशिम शहर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:09 IST2019-01-08T15:09:32+5:302019-01-08T15:09:58+5:30
वाशिम : नगरपरिषदेच्यावतिने शहर विकासांची कामे जोमात सुरु आहेत. यामुळे नागरिकांना सोयीचे होणार असले तरी संथगतिने सुरु असलेल्या कामाचा त्रास शहरवासियांसह वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

रस्त्यांची कामे संथगतिने; धुळीने माखले वाशिम शहर!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नगरपरिषदेच्यावतिने शहर विकासांची कामे जोमात सुरु आहेत. यामुळे नागरिकांना सोयीचे होणार असले तरी संथगतिने सुरु असलेल्या कामाचा त्रास शहरवासियांसह वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. शहरातील सुरु असलेले रस्ते खोदून ठेवल्याने व अनेक रस्त्यांची कामे बंद पडल्याने धुळीने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे संबधितांनी लक्ष देवून कामास गती देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांत उमटत आहेत.
वाशिम शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांचे कामे होत असल्याने शहरातील रस्त्याची समस्या मिटणार आहे. काही भागातील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याने त्या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु शहरातील मुख्य रस्त्यावरील काही रस्त्यांची मोजमापे झाली असून खोदकामेही करुन ठेवण्यात आली आहेत.परंतु प्रत्यक्षात कामास सुरुवात न झाल्याने या रस्त्यावर असलेल्या प्रतिष्ठान मालकांना, रहिवाश्यांना याचा मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम शहरातील सिंधी कॉलनी ते अकोला नाका रस्त्याचे मोजमाप होवून रस्ता कामास सुरुवात करण्यात आली होती. रस्त्यावरील झाडे तोडून बराच अवधी झाला. परंतु प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली नसल्याने सर्वत्र धूळ उडत असल्याने त्वचा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबधित अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून या कामांना गती देणे गरजेचे आहे.
रस्त्याची मोठया प्रमाणात असलेली कामे व मजबुतीकरणाकडे दिल्या जात असलेले विशेष लक्ष यामुळे रस्त्याचे कामे होण्यास वेळ लागत आहे. परंतु सदर रस्ते तयार झाल्यानंतर ते मजबुत व टिकाऊ राहणार आहेत. यासाठी सुरु असलेल्या कामांची पाहणी वेळोवेळी केली जात आहे. कामे वेळेत व मजबुतीसाठी प्रयत्न केल्या जात आहेत.
- राजेश घुगरे
बांधकाम अभियंता, नगर परिषद वाशिम