वाशिम जिल्ह्यात सहा शाळा आढळल्या अनधिकृत
By Admin | Updated: June 28, 2014 01:41 IST2014-06-28T00:58:51+5:302014-06-28T01:41:15+5:30
सतर्क राहण्याचे शिक्षणाधिकार्यांचे आवाहन.

वाशिम जिल्ह्यात सहा शाळा आढळल्या अनधिकृत
वाशिम : शासनाच्या मान्यतेशिवाय विद्यार्थ्यांची ह्यशाळाह्ण भरविणार्या सहा शाळा, प्राथमिक शिक्षण विभागाच्या तपासणी मोहिमेत अनधिकृत आढळून आल्या आहेत. शाळेच्या शासकीय मान्यतेची खात्री केल्यानंतरच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांनी केले आहे.
शासनाची मान्यता घेतल्यानंतर शैक्षणिक संस्थांना पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक आदी प्रकारातील शाळा सुरू करता येतात. जिल्ह्यात काही प्राथमिक शाळा शासनाची मान्यता न घेताच सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागाने तपासणी मोहिम राबवून शासनाची मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळा हुडकून काढल्या आहेत. जिल्ह्यात स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट मंगरुळपीर, संत गजानन महाराज इंग्रजी प्राथमिक शाळा कामरगाव ता. कारंजा, दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल मंगरुळपीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश स्कूल लाखाळा वाशिम, न्यू माईंड आईज इंटरनॅशनल स्कूल सिव्हिल लाईन वाशिम व दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल तामशी फाटा वाशिम अशा सहा शाळा अनधिकृ त सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीतून समोर आले आहे. अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या प्रवेश घेऊ नये, असे आवाहन अंबादास पेंदोर यांनी केले आहे.