सहा लाखांचा गुटखा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:28 IST2017-10-24T01:27:55+5:302017-10-24T01:28:25+5:30
वाशिम: पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने २३ ऑक्टोबरला पहाटे ४ च्या सुमारास स्थानिक शुक्रवार पेठ परिसरातील पवन इसापुरे यांच्या घरामधून ६ लाख ४२ हजारांचा गुटखा जप्त केला.

सहा लाखांचा गुटखा जप्त!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने २३ ऑक्टोबरला पहाटे ४ च्या सुमारास स्थानिक शुक्रवार पेठ परिसरातील पवन इसापुरे यांच्या घरामधून ६ लाख ४२ हजारांचा गुटखा जप्त केला.
वाशिम शहरात व परिसरात प्रतिबंधित गुटख्याचा अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहे. या अनुषंगाने पंधरा दिवसांपूर्वी सिंधी कॅम्प परिसरातील जीवनानी यांच्या गोडावूनमधून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठय़ा प्रमाणात गुटखा जप्त केला होता. या कारवाईला पंधरा दिवसही उलटले नसताना शहरातील शुक्रवारपेठ परिसरात असलेल्या तारागड चौकातील पवन इसापुरे यांच्या घरामध्ये मोठय़ा प्रमाणात गुट ख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर, पोलीस शिपाई राहुल अवचार, सचिन देशमुख व प्रदीप डाखोरे यांचा समावेश असलेल्या पथकाने इसापुरे यांच्या घरावर पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी ६ लाख ४२ हजार २0१ रुपयांचा गुटखा जप्त करून इसापुरे याला ताब्यात घेतले. वृत्त लिहेपर्यंत वाशिम शहर पोलीस स्टेशनला डायरीमध्ये नोंद नव्हती.