रिसोड तालुक्यातील सरपंच आरक्षणात सहा बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:37+5:302021-02-05T09:25:37+5:30
रिसोड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण मंगळवारी तहसील कार्यालयात काढण्यात आले. त्यात अनुसूचित जातींकरिता १९, अनुसूचित जमातींकरिता ०४, ...

रिसोड तालुक्यातील सरपंच आरक्षणात सहा बदल
रिसोड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण मंगळवारी तहसील कार्यालयात काढण्यात आले. त्यात अनुसूचित जातींकरिता १९, अनुसूचित जमातींकरिता ०४, नामाप्रकरिता २२, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले. त्यात १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीसाठी पूर्वी नेतन्सा आणि केनवड येथील सरपंचपदाचे आरक्षण पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले होते, तर आता नामाप्रसाठी जाहीर झाले आहे. त्याशिवाय लेहणी, करंजी, कंकरवाडी आणि खडकी सदार या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण पूर्वी नामाप्रसाठी जाहीर झाले असताना आता त्यात बदल होऊन या चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले. त्यामुळे या सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. दरम्यान, निवडणूक पार पडलेल्या इतर २६ ग्रामपंचायतीमधील आरक्षण पूर्वीप्रमाणेच असले तरी, या ठिकाणी इच्छुकांच्या मोर्चेबांधणीलाही वेग येणार आहे.