‘त्या’ प्रकरणातील सहा आरोपींना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:14 IST2017-07-26T02:14:26+5:302017-07-26T02:14:26+5:30

Six accused arrested in 'That' case! | ‘त्या’ प्रकरणातील सहा आरोपींना अटक!

‘त्या’ प्रकरणातील सहा आरोपींना अटक!

ठळक मुद्दे२६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: तालुक्यातील शिवणी रोड फाटा येथे १० जुलै रोजी घडलेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मंगरुळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त, माहितीनुसार फिर्यादी सागर सोलव (रा. वाशिम) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की १० जुलै रोजी घरी जात असताना रात्री ७.३० वाजता शिवणी फाटा येथे आरोपींनी शस्त्रांद्वारे आपणास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १५ ते २० आरोपींविरुद्ध कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, १५०, ३२६, ३०७, १२० ‘ब’ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी २५ जुलै रोजी आरोपी प्रभू ऊर्फ हनुमान तानाजी गोरे, तुकाराम गोरे, (रा. सोनखास, ता. वाशिम), नितीन हिवराळे, काशिनाथ गोरे (रा. वाशिम), प्रमोद मुळे (रा. वाकद), सुनील कंकाळ (रा. सावरगाव) यांना ताब्यात घेऊन मंगरुळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना २५ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २६ जुलैपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक कांबळे करीत आहेत.

Web Title: Six accused arrested in 'That' case!