नाल्याला आलेल्या पुरात सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:25 IST2019-07-02T18:25:05+5:302019-07-02T18:25:53+5:30
नाल्याला आलेल्या पुरात वाघी बु. येथील सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले.

नाल्याला आलेल्या पुरात सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले !
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : मंगळवार, २ जुलै रोजी वाघी परिसरात (ता. मालेगाव) धो-धो पाऊस झाला असून, नाल्याला आलेल्या पुरात वाघी बु. येथील सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले.
शिरपूर येथून जवळच असलेल्या वाघी बुद्रुक परिसरात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे वाघी ते झोपडपट्टी या दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला. दरम्यान, इयत्ता दुसºया वर्गात शिकणाºया पारस बाळू पवार (७) या आपल्या भावाला शाळेतून घरी आणण्यासाठी पूजा बाळू पवार(१४) ही शाळेत गेली होती. शाळेतून वाघी येथील झोपडपट्टी परिसरातील घरी जात असताना, या दरम्यान असलेल्या नाल्यातून जाण्याचा प्रयत्न करीत असताना दोघे बहिण-भाऊ पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती गावकºयांनी पोलीस व तहसिल प्रशासनाला दिली आहे.