पेट्रोल पंपावर एकच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST2021-06-11T04:27:44+5:302021-06-11T04:27:44+5:30

रिक्त पदांमुळे तपासणीत अडचणी वाशिम : परिसरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचणी वेगात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत; ...

A single crowd at the petrol pump | पेट्रोल पंपावर एकच गर्दी

पेट्रोल पंपावर एकच गर्दी

रिक्त पदांमुळे तपासणीत अडचणी

वाशिम : परिसरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचणी वेगात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत; परंतु आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात अडचणी येत आहेत.

घरकुलांची कामे अपूर्ण

कारंजा : काही लाभार्थींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने कारंजा तालुक्यातील २०८ घरकुलांची कामे अपूर्ण राहिली आहेत. अनेकांनी त्रुटी दूर केल्या असतानाही मात्र अद्याप त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही.

रस्त्यावर उभारले प्रवासी निवारे

शेलुबाजार : वाशिम ते शेलूबाजार हा नव्याने रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर पूर्वी असलेले प्रवासी निवारे तोडून नव्याने प्रवासी निवारे उभे करण्यात आल्याने प्रवाशांना सोयीचे झाले आहे.

जिल्हा रुग्णालयात पाण्याचा अभाव

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. पाण्याचे फिल्टरही बंद पडले आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.

Web Title: A single crowd at the petrol pump