शिरपूर येथे रस्त्यावर साचले पाणी
By Admin | Updated: July 13, 2014 22:51 IST2014-07-13T22:51:40+5:302014-07-13T22:51:40+5:30
पाउसामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याने ग्राम पंचायतचा गलधान कारभार पुन्हा चव्हाटयावर आला.

शिरपूर येथे रस्त्यावर साचले पाणी
शिरपूर जैन : एका महिन्यापेक्षा अधिक प्रतिक्षेनंतर ११ जुलै रोजी शिरपुरात पाऊस पडला या पाउसामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याने ग्राम पंचायतचा गलधान कारभार पुन्हा चव्हाटयावर आला.
शिरपूर जैनांची काशी म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच ते समस्यांचे माहेरघर असल्याचा लौकीक सुद्धा ग्राम पंचायतच्या नियोजन शुन्य कारभारामुळे मिळवित ओ. ११ जुलैच्या दुपारी बसस्थानक व परिसरात ३0 मिलीट दमदार पाउस पडला या पाउसामुळे बसस्थानक ते ग्राम पंचायत प्रवेशव्दारा पर्यंतचा परिसरात तलावा प्रमाणे पाणी साचले या साचलेल्या पाण्यातूनच गावातील नागरिकांसह बाहेर गावातून येणार्या व्यापारी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. याच प्रमाणे वार्ड नं.३ मधील गोपाल कृषी सेवा केंद्र ते स्व.रवि मेरकुटे यांच्या घरापर्यंत पाणीच पाणी साचले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे अवया १५ दिवसापुर्वी ग्राम पंचायतने जवळपास ३ लाख रुपये खचरुन पाणी वाहन नेणार्या नाली बांधकाम करण्यात आली आहे तसेच गुजरी चौकातही मोठया प्रमाणात पाणी साचले होते तर जि.प.मराठी कन्या शाळेच्या आवारात पाणी साचून वर्गखोलीच्या दरवाज्याजवळ चक्क डुकरांचा संचार होत असताना दिसून आहे जवळच पास अशा प्रकारे गावातल सर्वच रस्तयांची व गल्ली बोळयांची अवस्था असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावामध्ये मागील दोन तिन वर्षात विकास कामेही मोठया प्रमाणात झाली परंतु त्याचा दर्जा मात्र सुमार असल्यानेच गावामध्ये मोठया समस्या निर्माण झालेल्या असल्याचे गावकर्यांमध्ये बोलले जात आहे.