शिरपूर येथे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:54 PM2018-12-22T13:54:06+5:302018-12-22T14:22:13+5:30

शिरपूर जैन :  येथील पलसिद्ध संस्थानमध्ये शिवधर्म पारायण सोहळा समारोपानिमित्त २२ डिसेंबर रोजी मठाधिपती सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांची भव्य मिरवूणक काढण्यात आली.

Sidhling Shivacharya's procession in Shirpur |  शिरपूर येथे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची मिरवणूक

 शिरपूर येथे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची मिरवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन :  येथील पलसिद्ध संस्थानमध्ये शिवधर्म पारायण सोहळा समारोपानिमित्त २२ डिसेंबर रोजी मठाधिपती सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांची भव्य मिरवूणक काढण्यात आली.यावेळी वाशिमसह परजिल्हयातील लिंगायत समाजबांधवांची उपस्थिती लाभली होती.

येथील पलसिद्ध संस्थानमध्ये शिवधर्म पारायण सोहळा २आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याच्या समाप्ती साठी साखरखेर्डा येथील मठाधिपती  सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचे शिरपूर नगरीत  २२ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता आगमन झाले. त्याप्रसंगी शिरपूर सह संपूर्ण वाशिम जिल्हा, परभणी,  हिंगोली, व बुलढाणा जिल्ह्यातून लिंगायत समाज बांधव  शिरपूर येथे उपस्थित झाले होते. लिंगायत समाजाच्यावतीने स्थानिक रिसोड फाट्याहून विविध भजनी मंडळाच्या सानिध्यात मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक नगरातून पलसिद्ध संस्थांमध्ये देण्यात आली. तेथे सिद्धलिंग महाराजांचे प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर आयोजित भव्य महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या कार्यक्रमासाठी वीरशेव नवयुवक मंडळांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आमदार अमित झनक यांचीसुद्धा उपस्थिती लाभली होती.

Web Title: Sidhling Shivacharya's procession in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.