Shukshukat in the crowded Gujri Chowk | गर्दीने गजबजणाऱ्या गुजरी चौकात शुकशुकाट

गर्दीने गजबजणाऱ्या गुजरी चौकात शुकशुकाट

शिरपूर जैन : दररोजचा भाजी बाजार भरणाऱ्या येथील गुजरी चौकात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार भरविण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या चौकात शुकशुकाट आहे.

शिरपूर येथे आसेगाव रस्त्यावरील नियोजित जागेवर दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. त्यामुळे गुजरी चौकात कोणीही भाजी विक्रीची दुकाने लावू नयेत, अशा सूचना कोरोना समितीने दिल्या आहेत. यासंबंधी काही भाजी विक्रेत्यांशी चर्चा केली असता, आठवडा बाजार गावापासून दूर आहे. त्यामुळे ग्राहक त्याठिकाणी यायला तयार नसतात. याशिवाय घाण पसरल्याने दुर्गंधी सुटते. ही बाब लक्षात घेऊन गुजरी चौकातच ठराविक अंतरावर नियमांचे पालन करण्याचे बंधन घालून भाजी विक्रीची दुकाने लावण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी केली आहे.

Web Title: Shukshukat in the crowded Gujri Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.