शिवभाविकांची काशी वत्सगुल्मनगरी

By Admin | Updated: August 25, 2014 01:56 IST2014-08-25T01:41:25+5:302014-08-25T01:56:05+5:30

वत्सगुल्मनगरीत काशीनंतर सर्वातजास्त महादेवाची मंदिर असल्याचा उल्लेख वत्सगुल्म महात्म्य या प्राचीन ग्रंथात आला आहे.

Shivaji's Kashi Vatsgulmagni | शिवभाविकांची काशी वत्सगुल्मनगरी

शिवभाविकांची काशी वत्सगुल्मनगरी

वाशिम : समुद्र सपाटीपासून १८४0 फुट उंचावर असलेल्या व परिसरात ५ नदयांचा उगम असलेल्या तसेच प्राचीन जोतीष्यतज्ज्ञांनी जी पृथ्वीची मध्यरेषा कल्पिली आहे त्या वत्सगुल्म नगरीत काशीनंतर सर्वात जास्त महादेवाची मंदिर असल्याचा उल्लेख वत्सगुल्म महात्म्य या प्राचीन ग्रंथात आला आहे.
ङ्म्रावण महिनाचे मुळात धार्मिकदृष्टीने अत्यंत महत्त्वाचा राहीला आहे. यामुळे महिनाभर मंदिरामध्ध्ये गर्दी तर दिसून येतेच शिवाय दर ङ्म्रावणातील सोमवारी शहराला यात्रेचे स्वरूप येते. काशीनंतर सर्वात जास्त महादेवाचे मंदिरे असलेल्या वाशिम शहरात आणखी एक शिव मंदिर असते तर शहराला काशीचा दर्जा मिळाला असता, असा गौरवास्पद उल्लेख ह्यवाशिम जिल्हयाचा इतिहासह्ण व ह्यवत्सगुल्म महात्म्यह्ण या ग्रंथात आला आहे.
ङ्म्रावणात दररोज हर्र बोला महादेव.. चा गजर कानावर येत नसावा, असा दिवस येत नाही. दररोज शहरातून एक ना एक कावड मडळ शिवलिंगाच्या दर्शनाकरीता व तिर्थ आणण्याकरीता तिर्थस्थळी जातांना दिसून येतात. वत्सगुल्म नगरीत प्राचीन पुरातन बरेच शिवाचे मंदिरे आहेत. त्यात प्रामुख्याने करूणेश्‍वर, मध्यमेश्‍वर, चंदेश्‍वर, पदमेश्‍वर, पाळेश्‍वर, खंडेश्‍वर, मल्लीर्काजून, नंदिकेश्‍वर, अमृतेश्‍वर, गुप्तेश्‍वर, कालेश्‍वर, निळकंठेश्‍वर, पांडुरंगश्‍वर, खोलेश्‍वर, लाखाळेश्‍वर, नागातिर्थ, रामेश्‍वर, एकादश मंदिर, शिवालय, चिंतामणेश्‍वर मठ, बाळकेश्‍वर, महादेव मंदिर, नागनाथ मंदिर, शिवगोरख, विश्‍वेश्‍वर, राज राजेश्‍वर, सिध्देश्‍वर जागमाथा, जंगलेश्‍वर, हुडी महादेव, मंगलेश्‍वर, नागनाथ, त्र्यंबकेश्‍वर, भुवनेश्‍वर बारा ज्योर्तीलिंग, लंगडूजी मंदिर, भटगल्ली त्र्यंबकेश्‍वर, गंगेश्‍वर, अध्रेश्‍वर यासह बरेच छोटे मोठे मंदिरे आहेत. बरेच मंदिर प्राचीन पुरातन असून या मंदिराच्या काहीना काही आख्यायिका आढळून येतात. वत्सगुल्मनगरीची खरी ग्रामदेवता करूणेश्‍वर असून येथे प्राचिन मंदिर आहे. पुराणकाळी वत्सऋषिने अनेक वर्ष तपश्‍चर्या केल्यामुळे ङ्म्री शिवाला करूणा उत्पन होवून अनेक वर्ष तपश्‍चर्या केल्यामुळे ङ्म्री शिवाला करूणा उत्पन्न होवून अनेक देवतांसह वत्सऋषिंच्या आङ्म्रमात ते आले व शंकराने करूणेशर नावाने येथेच कायमचे वास्तव्य केले.अशी आख्यायिका आहे. तसेच मध्यमेश्‍वर हे प्राचिन मंदिर असून भास्कराचार्याच्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथात ज्योतिष शास्त्राकरिता उल्लेख केल्याप्रमाणे ऋषिमुनिंनी लंकेपासून ते मेरू पर्वतापर्यंत मध्यरेषा कल्पिलेली आहे.

Web Title: Shivaji's Kashi Vatsgulmagni