शिरपूरच्या जि.प. कन्या शाळेतील पाण्याची समस्या निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:49+5:302021-03-18T04:41:49+5:30
जैन मंदिर रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे विद्यार्थिनींसह शिक्षकांना पाणी पिण्यासाठी गावात ...

शिरपूरच्या जि.प. कन्या शाळेतील पाण्याची समस्या निकाली
जैन मंदिर रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे विद्यार्थिनींसह शिक्षकांना पाणी पिण्यासाठी गावात यावे लागत होते. ही समस्या दूर करण्याची मागणी स्थानिक युवक गोपाल जाधव, दिलीप जाधव, राजू जाधव, भागवत जाधव यांनी डॉ.श्याम गाभणे यांच्याकडे केली. त्याची दखल घेऊन डॉ.श्याम गाभणे यांनी या शाळेत कूपनलिकेची सुविधा उपलब्ध केली. बुधवार १७ जानेवारी रोजी शाळेचा परिसरात डाॅ.श्याम गाभणे यांच्या उपस्थितीत या कूपनलिकेचे खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक श्रीराम जाधव, भास्करराव देशमुख, संजय जाधव, शाळा समिती अध्यक्ष गजानन खरसडे, सलिम रेघीवाले, अमित वाघमारे, प्रशांत क्षीरसागर, गोपाल जाधव, दिलीप जाधव, राजू जाधव, मुख्याध्यापक सरनाईक, नीलेश शिंदे, वसंता काळे, महिला शिक्षिका देशमुख, शिंदे, दलाल व इतर शिक्षक उपस्थित होते.