शिरपूर परिसरातील ७०० थकबाकीदार शेतक-यांची विज जोडणी खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:59 IST2017-10-29T19:57:27+5:302017-10-29T19:59:17+5:30
सुल्तानी वसुली अंतर्गत एकट्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील गावच्या ७०० हून अधिक शेतक-यांच्या विज जोडण्या रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आल्या. त्यामुळे शेतक-यांचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.

शिरपूर परिसरातील ७०० थकबाकीदार शेतक-यांची विज जोडणी खंडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: रब्बी हंगाम आता सुरू झाला असताना विजवितरणकडून थकबाकी वसुलीच्या नावाखाली विजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या सुल्तानी वसुली अंतर्गत एकट्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील गावच्या ७०० हून अधिक शेतक-यांच्या विज जोडण्या रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आल्या. त्यामुळे शेतक-यांचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.
जिल्ह्यातील ५३ हजार ७७९ ग्राहकांकडे असलेली ३१६ कोटी ७६ लाखांची थकबाकी वसुल करण्यासाठी फायदा घेण्याचे ठरविले आणि एप्रिल ते जुलै २०१७ हे त्रैमासिक चालू देयक त्वरीत भरण्याचे शेतकºयांना सांगण्यात आले आहे. हे देयक अदा न केल्यास विज पुरवठा तात्काळ खंडीत करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. याच मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शिरपूर जैन परिसरातील ७०० ते ८०० शेतकºयांच्या कृषीपंपांची जोडणी रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आली. वाघी, बोराळा, शेलगाव खवणे, खंडाळा, ढोरखेडा, कोठा आदि गावांतील शेतकºयांच्या कृषीपंपासाठी खंडाळा ३३ केव्ही वीज उपकेंद्रांवरून शिरपूर फिडरद्वारे होणारा वीज पुरवठाच विज वितरणच्या अधिकाºयांनी बंद केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील नुकताच उगवलेले हरभरा पीक संंकटात आले असून, पेरलेले गह, ज्वारीचे बियाणे उगवेल की नाही, ही भिती निर्माण झाली आहे.