किराणा दुकानाचे कुलूप तोडून ६५ हजार रुपयांचा माल लंपास
By Admin | Updated: March 11, 2015 01:46 IST2015-03-11T01:46:28+5:302015-03-11T01:46:28+5:30
शटरचे कुलूप तोडून दुकानातील साहित्याची नासधूस .

किराणा दुकानाचे कुलूप तोडून ६५ हजार रुपयांचा माल लंपास
मालेगाव : येथील शिव चौकातील विजय किराणाचे कुलूप तोडून दुकानातील किराणा साहित्य व रोख असा ६४ हजार १२४ रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ९ मार्चला मध्यरात्री घडली.
शिव चौक येथील विजय किराणाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील साहित्याची नासधूस करण्यात आली तसेच काजू १0 किलो, बदाम १८ किलो, अंजीर, खोबरेल तेल, साखर, ड्रायफूटचे पॅकेट व रोकड असा ६४ हजार १२४ रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. दुकानमालक जितेंद्र गोरे यांना १0 मार्च रोजी सकाळी दुकानाजवळ राहणार्या व्यक्तीने फोन करून दुकानात चोरी झाल्याचे कळवले. गोरे घटनास्थळी आल्यावर त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. गोरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर ठाणेदार तट यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्वानपथक बोलविण्यात आले होते. तथापि, श्वानपथकाला अपयश आले. पोलिसांची रात्रीची गस्त नसल्यामुळे चोरट्यांना भीती राहिलेली नाही. रात्रीची गस्त कडक करावी, अशी मागणी आहे.