शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी जलसंधारणासाठी केले श्रमदान

By admin | Updated: April 22, 2017 18:29 IST

लग्नापेक्षाही जलसंधारणाचे कामे महत्वाचे हे त्याने आपल्या कृतीतुन  गावकºयांना पटवुन दिले.

कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील शेवती येथील आनंद नावाच्या नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी आपल्या राहत्या गावी जलसंधारणाच्याा कामाकरिता २१ एप्रिल रोजी गावकरी व प्रशासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यासमवेत श्रमदान करुन आपल्या लग्नासाठी मार्गक्रमण केले.महाराष्ट्रातील संभाव्य पाणी टंचाई दूर करण्याच्या हेतुने सिने अभिनेता अमिर खान यांनी पुढाकार घेवुन व महाराष्ट्र शासनाला विश्वासात घेवुन पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. गावातील जलस्त्रोताची खोलीकरण करुन पाणी साठा वाढविण्यासाठी वॉटर कप स्पर्धेंतर्गत मागील वर्षी राज्यातील दहा तालुक्यात जलसंधारणााची कामे केली.याच वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्यात यावर्षी राज्यातील ३० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याकरिता  कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून शासन व प्रशासनाच्या प्रत्येक घटकासहीत गावकरी मोठ्या संख्येने जलसंधारणाच्या कामाकरिता श्रमदान क रीत आहे. शेवती येथील रहिवासी विलास देवळे यांचे चिरंजीव आनंद याचा शुभविवाह वाशिम तालुक्यातील वाघदाडी येथील विश्वनाथ वानखडे यांच्या सपना नावाच्या कन्येशी २१ एप्रिल रोजी ठरला असतांना केवळ १० वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आनंदने आपल्या गावातील पाणी समस्या दुर करण्यासाठी   लग्नाला जाण्याआधी श्रमदान करुन लग्नापेक्षाही जलसंधारणाचे कामे महत्वाचे हे त्याने आपल्या कृतीतुन  गावकऱ्यांना पटवुन दिले.  यावेळी कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी.पवार,विस्तार अधिकारी साई चव्हाण, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.