विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गाेडी कायम ठेवण्यासाठी शरदचे आगळे-वेगळे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:09+5:302021-09-14T04:48:09+5:30

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहण्यासाठी सर्वप्रथम ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ हा व्हाॅट्सॲॅप ग्रुप तयार केला. याव्दारे अनेक ...

Sharad's unique activities to keep the study vehicle among the students | विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गाेडी कायम ठेवण्यासाठी शरदचे आगळे-वेगळे उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गाेडी कायम ठेवण्यासाठी शरदचे आगळे-वेगळे उपक्रम

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहण्यासाठी सर्वप्रथम ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ हा व्हाॅट्सॲॅप ग्रुप तयार केला. याव्दारे अनेक शिक्षक व विद्यार्थी पालक जाेडल्या गेलेत. यानंतर त्यांनी ‘ज्ञानयात्री तंत्रस्नेही’ या वेबसाईटची निर्मिती करून याद्वारे पहिली ते बारावीपर्यंत सर्व विषयनिहाय चाचण्या साेबतच अभ्यासेतर उपक्रमाला प्राधान्य देऊन ते सुद्धा तयार केले.

विद्यार्थ्यांना विषयाचे सखाेल ज्ञान मिळावे यासाठी यूट्यूब चॅनलची निर्मिती करून विषयनिहाय शंभरच्यावर शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओसह शासनाचा सेतू अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक झाले. विशेष म्हणजे या सर्व कार्याची दखल श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ॲॅड. किरणराव सरनाईक यांनी घेतली. त्यांचा नुकताच शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.

याप्रसंगी अनिताताई सरनाईक, स्नेहदीपभैय्या सरनाईक, लाव्हरे सर, प्राचार्य अरुण सरनाईक आदींची उपस्थिती हाेती.

या शासनकृत उपक्रमाची उत्कृष्टपणे अंमलबजावणी

‘थॅक्स अ टीचर’ स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्राचे वितरण, व्हाॅट्सॲॅप स्वाध्याय उत्कृष्ट अंमलबजावणी, अमृतमहाेत्सव स्वातंत्र्याचा या उपक्रमांतर्गत जिल्हानिहाय, राज्यनिहाय प्रश्नमंजुषा, दीक्षा ॲॅप लिंक, क्लिप बुक, ई-लायब्ररी, शिकू आनंदे व इतर अनेक उपक्रम.

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविलेले उपक्रम

दिनविशेष चाचणी, गाेष्टीचा शनिवार, स्पर्धा परीक्षा चाचणी, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धा आयाेजन, करिअर मार्गदर्शन विविध परीक्षांचे नियाेजन, रामायण, मृत्युंजय, श्यामची आई या व अशा अनेक पुस्तके विद्यार्थ्यांसाठी ऑडियाे स्वरूपात तयार केले.

Web Title: Sharad's unique activities to keep the study vehicle among the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.