दोन अपघातांमध्ये सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 01:45 IST2015-04-17T01:45:14+5:302015-04-17T01:45:14+5:30
मंगरुळपीर रस्त्यावरील दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जण जखमी.

दोन अपघातांमध्ये सात जखमी
कारंजा लाड : मंगरुळपीर रस्त्यावरील प्रगतीनगर व वाई फाट्यानजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जण जखमी झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी सकाळी १0 ते १२ वाजताच्या सुमारास घडल्या. कारंजा तालुक्यातील वढवी येथून एमएच ३७ जी-९८२ क्रमांकाची ऑटोरिक्षा प्रवासी घेऊन कारंजात येत असताना मार्गातच प्रगतीनगरजवळील वाइन बारसमोर चालकाने रस्त्याच्या कडेला प्रवासी उतरवून देण्यासाठी ऑटोरिक्षा उभी केली. यावेळी पाठीमागून एमएच ३0 एबी २७३0 क्रमांकाच्या बोलेरो पीकअप वाहनाच्या चालकाने भरधाव वेगात ऑटोरिक्षाला धडक दिली. अपघातात श्रीकृष्ण पांडुरंग इंगोले (४५), दादाराव पुंडलिक कदम (३५), पार्वताबाई खंडूजी कदम (५८), अर्जुन सुखदेव वनारसे (३0) सर्व रा.वढवी व अय्याज अब्दुल सलाम (२५ रा. पोहा) जखमी झाले. बोलरो पीकअपचालक राजेश सुखदेव राठोड (रा. झोडगा ता. बाश्रीटाकळी जि. अकोला) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर तालुक्यातील वाई फाट्यानजीक सकाळी साडेअकराच्या सुमारास शेवती येथील कलाबाई मनिराम चव्हाण (७५) या वृद्धेला अज्ञात ट्रकने धडक दिली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.