राज्यस्तरीय स्पर्धेकरिता वाशिम जिल्ह्यातुन खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 13:39 IST2017-12-18T13:37:44+5:302017-12-18T13:39:12+5:30

वाशिम - २९ ते ३१ डिसेंबर रोजी होणारी ७० वी पुरुष व ३३ वी महिला वरिष्ठ  राज्यस्तरीय अजिंक्यपद वेटलिफ्टींग स्पर्धा २०११ अकोला येथे होत  आहे.  

The selection of players from the district of Washim for state level competition | राज्यस्तरीय स्पर्धेकरिता वाशिम जिल्ह्यातुन खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय स्पर्धेकरिता वाशिम जिल्ह्यातुन खेळाडूंची निवड

ठळक मुद्देजिल्हा क्रिडा संकुल परिसरातील वेटलिफ्टींग प्रशिक्षण केंद्र येथे निवड चाचणी १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.  राज्यस्तरीय अजिंक्यपद वेटलिफ्टींग स्पर्धा २०११ अकोला येथे होत  आहे. 

वाशिम - २९ ते ३१ डिसेंबर रोजी होणारी ७० वी पुरुष व ३३ वी महिला वरिष्ठ  राज्यस्तरीय अजिंक्यपद वेटलिफ्टींग स्पर्धा २०११ अकोला येथे होत  आहे.  याकरिता वाशिम जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशन व वेटलिफ्टींग क्लब वाशिम च्यावतीने जिल्हा क्रिडा संकुल परिसरातील वेटलिफ्टींग प्रशिक्षण केंद्र येथे निवड चाचणी १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. चाचणी मध्ये जिल्हयातुन ४५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत ५६ वजन गटामध्ये रमजान दरवे, कारंजा ६२ किलो,  रुपेश चोपडे वाशिम ६९,   नारायण ठेंगडे वाशिम, चेतन इंगोले ८५ किलो, वजन गटातमधुन राजु वैद्य या खेळाडंूंची निवड करण्यात आली.

 स्पर्धेचे उद्घाटन धनंजय वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती अनिल देशमुख ,अनिल थडकर, रणजीत कथळे,  नारायण ठेंगडे, हनुमान डाखोरे,  शुभम कंकाळ, अजय शिंदे, सनी इंगळे,  अमोल सुरुशे,  वैभव इंगळे, भागवत गोडघासे,  आदिंची उपस्थिती होती. निवड झालेल्या खेळाडूंनी संघटनेच्यावतीने तसेच मान्यवरांच्याहस्ते कौतुक करण्यात आले.

Web Title: The selection of players from the district of Washim for state level competition