अन्न सुरक्षा अभियानासाठी ५ गावांची निवड

By Admin | Updated: July 21, 2014 23:20 IST2014-07-21T23:20:12+5:302014-07-21T23:20:12+5:30

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानासाठी मानोरा तालुक्यातील ५ गावांची निवड जिल्हास्तरावरून झाली असून गळीत धान्य अभियानाकरिता एका गावाची निवड झाली आहे.

Selection of 5 villages for Food Security campaign | अन्न सुरक्षा अभियानासाठी ५ गावांची निवड

अन्न सुरक्षा अभियानासाठी ५ गावांची निवड

मानोरा : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानासाठी मानोरा तालुक्यातील ५ गावांची निवड जिल्हास्तरावरून झाली असून गळीत धान्य अभियानाकरिता एका गावाची निवड झाली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २0१४-१५ च्या खरीप हंगामाकरिता सदर गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मानोरा तालुक्यातील चिखली, धावंडा, जामदरा, घोटी, ज्योतिबानगर, भोयणी या गावांचा समावेश आहे तर गळीत धान्य अभियानाकरिता दापुरा बु. या गावाची निवड झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी निवड झालेल्या गावातील महिला, मागासवर्गीय महिला, महिला स्वयंसेवी संघ यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार असून त्यानंतर अत्यल्पभुधारक, अल्पभुधारक लहान शेतकरी व मोठे शेतकरी यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. यावेळी शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या लाभामध्ये नॅपसॅक स्प्रेअर, पॉवरस्प्रेअर, ४६0 खिड्डी व १३८ रोटावेटर १८९, मोबाईल रेनगन ४६, पंपयंत्र २३0 एचडीपीई पाईप २९३६, मल्टीक्रॉप प्लॅटर व रिअफो प्लॅटर ५४ नगांचा समावेश आहे. गळीत धान्य अभियानात निवड झालेल्या गावातील लाभार्थ्यांंना ५0 टक्के अनुदानावर स्प्रे पंप (१६ लिटर) स्प्रे पंप १६ पेक्षा जास्त, रोटावेटर, एचडीपीई पाईप व मळणीयंत्र ५0 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: Selection of 5 villages for Food Security campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.