गावठी दारू जप्त
By Admin | Updated: June 21, 2014 00:34 IST2014-06-21T00:15:12+5:302014-06-21T00:34:38+5:30
वाशिम येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने १११0 लिटर मोहासडवा जागेवरच नष्ट केला

गावठी दारू जप्त
वाशिम : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने मुंगळा शिवारातील धरणाच्या काठी छापा टाकून सुमारे १११0 लिटर मोहासडवा जागेवरच नष्ट केला तर ३२ लिटर गावठी दारु, १ मोटार सायकल, तीन सायकली आदी एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
या शिवाय तिवळी येथील रामदास गवळी यांच्या घरातून ७ किलो मोहाफले व १0 लिटर गावठी दारु तर दुधाळा येथील एका घरातून १८0 मिलीच्या ३५ देशी दारुच्या क्वार्टर्स जप्त केल्या गेल्या. शिरपूर येथे गवळीपुरा झोपडपट्टीजवळ अवैधरित्या बनावट ताडी विक्री केंद्रावर छापा मारला असता आरोपी रमेश जैस्वाल यांच्या ताब्यातून ७0 लिटर बनावट ताडी व ताडी बनविण्याचे इतर साहित्य जप्त केले. .सदर कारवाईमध्ये ए.एस.आय. वाकपांजर आडे, जवान खाडे, राठोड, मगरे, चिपडे या महिला जवान, शारदा घोगरे यांनी सहकार्य केले.